Advertisement

अनिकेत बियरबाराजवळच्या शेडमध्ये आढळला ६ किलो गांजा,सापडणार का सूत्रधार ?

प्रजापत्र | Wednesday, 26/07/2023
बातमी शेअर करा

बीड-पाटोदा शहरातील अनिकेत  बियर बारजवळील एका पत्र्याच्या शेडमधून जवळपास ६ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.या कारवाईत पोलिसांनी ६४ हजार १०० रुपयांचा माल जप्त केला असून पाटोदा पोलीस ठाण्यात याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांनी गांजा बाळगणारा राहूल पोपट जावळे (वय-२३,रा.भीमनगर,पाटोदायाला याला अटक केली असली तरी यातील सूत्रधारापर्यंत पोलीस पोहचणार का हा प्रश्नच आहे. 
       पाटोदा शहरातील अनिकेत बिअर बारजवळील एका पत्र्याच्या शेडमधून गांज्याची विक्री मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत त्या शेडमधून तब्ब्ल ६ किलो गांजा जप्त केला.या कारवाईत ६४ हजारांचा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणात गांजा बाळगणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. 

 

सामन्यांना 'राख' लावणारा सूत्रधार कोण ? 
या प्रकरणात पोलिसांनी एका राजकीय कार्यकर्त्याची बराचवेळ चौकशी केल्याची देखील माहिती आहे. स्वतःला 'राष्ट्रवादी ' विचारांचा म्हणवणाऱ्या एका राजकीय कार्यकर्त्याचे या संपूर्ण प्रकरणात काही संबंध आहेत का आणि गांजा विक्रीतून गोरगरीबांना 'राख ' लावण्याचा हा धन्दा किती विस्तारला आहे,हे समोर येणे आवश्यक आहे. यात एका राजकीय कार्यकर्त्याची चौकशी पोलिसांनी केल्यानंतर पोलिसांवर देखील 'वरून ' दबाव असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे प्रकरण केवळ एका आरोपीवर थांबणार का असले धंदे करणारांची पाळेमुळे खणून काढत पोलीस मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचणार  याची चर्चा सध्या जोरात आहे. सत्तेने देखील कोणत्या गुन्ह्यात कोणाची पाठराखण करायची हे ठरविले पाहिजे अशीही चर्चा पाटोद्यात आहे. 
 

Advertisement

Advertisement