Advertisement

मालवाहू ट्रक पलटी

प्रजापत्र | Wednesday, 26/07/2023
बातमी शेअर करा

केज - सरकी घेऊन चाललेला ट्रक माळेगाव जवळ आला असता वळणावर दुचाकीला वाचविताना पलटी झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा घडली. यामध्ये ट्रक चालक जखमी झाला आहे.

माजलगाव येथून सरकी पेंड घेऊन सांगलीकडे जाणार (एमएच ११ एम ६१११) सहा चाकी मालवाहू टाटा ट्रक खामगाव पंढरपूर (pandharpur) महामार्गावर केज (kaij) तालुक्यातील माळेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) चौकात वळणावर चुकीच्या दिशेने आलेल्या एका दुचाकीला वाचवितांना ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने जळवच्या खड्यात जाऊन पलटी झाला. ही घटना मंगळवारी ( दि.२५) रात्री दहा वाजता घडली. यात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अपघातात (accident) चालक संतोष भारत राठोड (वय-२८) मोहखेड ता.धारूर याच्या नाकाला दुखापत झाली आहे. 

Advertisement

Advertisement