Advertisement

नेकनूरच्या पोलीस ठाण्यात आरोपीने घेतली फाशी

प्रजापत्र | Saturday, 10/10/2026
बातमी शेअर करा

बीड-बालाघाटवरील नेकनूर पोलीस ठाण्यात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये फाशी घेतल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सुदैवाने यात आरोपीचा जीव वाचला असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
   बालाजी शिंदे (वय-22,रा. वाशी) असे आरोपीचे नाव आहे. आवादा कंपनीच्या चोरी प्रकरणात त्याला ताब्यात घेण्यात आले होते.सदर आरोपीवर मकोका देखील लावण्यात आलेला आहे. नेकनूरच्या लॉकअपमध्ये पहाटे 2 ते 2.30 च्या दरम्यान पांघरून घेण्याच्या रगचा दोरा उसवून आरोपीने गळ्याभोवती आवळत स्वतःला फाशी घेतली. पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवल्याने बालाजीचे प्राण वाचले असून त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रभारी मंगेश साळवे यांच्या नियुक्तीपासून ठाणे कायम वादात असताना या घटनेमुळे तर अनेक प्रश्न उपस्थितीत होऊ लागले आहेत.

Advertisement

Advertisement