नवी दिल्ली - ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर आज सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी झाली. मशाल चिन्हाच्या याचिकेवरची सुनावणी सहा आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत याचिका दाखल केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडणार होती. मात्र, समता पक्षाकडे पूर्ण कागदपत्र नसल्याने सुनावणी पुढे ढकलली गेली आहे.
बातमी शेअर करा