बीड दि. १७ (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यात महसूल विभागातील अधिकाऱ्यांमध्ये अवघ्या दोन दिवसातच फेरबदल करण्यात आले आहेत . परिविक्षाधीन जिल्हाधिकारी आदित्य जीवने यांच्याकडे बीडच्या उपविभागीय अधिकारी पदाची सूत्रे देण्याचे आदेश काढण्यात आले होते, मात्र त्यात दोन दिवसातच आता त्यांच्याकडे पाटोदा उपविभागाचे सूत्रे देण्यात आली आहेत. तर बीडच्या तहसीलदारपदाचा अतिरिक्त पदभार शुक्रवारी नायब तहसीलदार सुहास हजारे यांनी घेतला होता. त्यात आता बदल करण्यात आला असून आता तहसीलदारपदाचा अतिरिक्त पदभार नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्याकडे देण्यात आला आहे. अवघ्या दोनच दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना महसूल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये स्वतःचे आदेश बदलावे लागले याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे .
बातमी शेअर करा