Advertisement

विपूल पिंगळें यांच्यावर हल्ला

प्रजापत्र | Sunday, 16/07/2023
बातमी शेअर करा

बीड, दि. 16 युवा शिवसेनेचे (उबाठा) मराठवाडा विभागीय सचिव विपूल पिंगळे (VIPUL PINGLE) यांच्यावर पाच ते सहा जणांनी हल्ला (ATTACK) केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास शिवाजी चौक (जिल्हा परिषदेच्या समोर) परिसरात घडली. यामध्ये पिंगळे जखमी (INJURED) झाले असून त्यांना उपचारार्थ बीडच्या शासकिय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बीड शहर ठाण्याचे प्रभारी ठाणेदार शिवाजी बंटेवाड यांनी तात्काळ जिल्हा रूग्णालयात जावून पिंगळेंचा जबाब नोंदविला. या प्रकरणी बीड शहर ठाण्यात पाच ते सहा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

Advertisement

Advertisement