औरंगाबाद : जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूचा उगम चीनमधून झाल्याने बहुतांश देशांनी चीनवर बहिष्काराची भूमिका घेतली होती. भारत-चीन सीमेवरील तणावामुळे उभय देशांचे संबंधही बिघडले होते. भारतातून चीनला तांदळाची निर्यात झाल्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होणार आहे. कारण तुमच्या-आमच्या रोजच्या जेवणाचा अविभाज्य भाग असलेल्या तांदळाचे भाव गगनाला भिडल्यामुळे खिशाला कात्री बसणार आहे. चीनने तांदूळ खरेदी केल्यामुळे देशांतर्गत तांदळाचे भाव वाढले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तांदळाचे दर गगनाला भिडले आहेत. तांदळाच्या किमतीत क्विंटलमागे तब्बल 500 ते 700 रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच किलोमागे पाच ते सात रुपयांनी दरात वाढ झाली आहे. साठेबाज व्यापाऱ्यांनी चीनला तांदूळ पाठवला. परिणामी देशांतर्गत तांदळाची आवक घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. औरंगाबादसह संपूर्ण राज्यात तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
हेही वाचा