Advertisement

 चारित्र्यावर संशय; पत्नीच्या पोटात चाकू खुपसून खुनाचा प्रयत्न

प्रजापत्र | Tuesday, 16/09/2025
बातमी शेअर करा

धारूर दि.१६(प्रतिनिधी): कौटुंबिक (Crime)वादातून पतीने पत्नीच्या पोटात चाकू खुपसून खूनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शुक्रवार (दि.१२) रोजी रात्री धारूर कसबा विभागात घडली.  

      सारिका महादेव कानमोडे (रा. गणपती मंदिराजवळ, कसबा विभाग, धारूर) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पत्नीचे नाव आहे.शुक्रवार (दि.१२) सप्टेंबर  रोजी रात्री ११. ३० वाजता त्या घरी झोपलेल्या असताना पती महादेव याने संशय घेत घरगुती वादातून त्यांच्यावर धारदार चाकूने पोटावर छातीखाली वार केला.अचानक झालेल्या या हल्ल्यात सारिका कानमोडे गंभीर जखमी झाल्या. त्यांनी आरडाओरड केल्यावर (Crime) आरोपी पती पळून गेला. त्यानंतर जखमीने भावाकडे धावत जाऊन मदत मागितली. शेजारी आकाश मोरे व आदित्य मोरे यांनी तातडीने स्कूटीवर बसवून सरकारी रुग्णालय धारूर येथे दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.या प्रकरणी पती महादेव सुभाष कानमोडे याच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

Advertisement