Advertisement

गावात दहशत करण्यासाठी बाहेर जातांना सरासर पिस्टलसह शस्त्रांचा वापर!

प्रजापत्र | Wednesday, 12/07/2023
बातमी शेअर करा

 

बीड - बाहेर जातांना दहशत पसरविण्याच्या इराद्याने आपल्या गाडीत,कंबरेला पिस्टल, तलवार, कत्ती सारखे शस्त्र बाळगून फिरणाऱ्या तीन सख्या भावंडांना एलसीबीने आज (दि.12) रोजी सकाळी राहत्या घरातून बेड्या ठोकल्या. तर एकजण फरार झाला. त्यांच्याकडून पिस्टल, तलवार, कत्ती, चाकू असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

 

 

अधिक माहिती अशी कि, बंडू उर्फ बंटी विश्वनाथ उदार (वय 37), राजू उर्फ स्वप्निल विश्वनाथ उदार (वय 30), सचिन विश्वनाथ उदार (वय 32), संतोष विश्वनाथ उदार (वय 30) असे आरोपींचे नावे आहेत. हे सर्व अंबाजोगाई तालुक्यातील पुस येथील राहणार आहेत. गावाजवळच त्यांचे हॉटेल आहे. तिथे किंवा बाहेर फिरताना हे जवळ शस्त्र बाळगून दहशत निर्माण करायचे. स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी घरी छापा मारला. यावेळी एक पिस्टल, तलवार, कत्ती, चाकू अशी शस्त्रे व विदेशी दारु असा 2 लाख 85 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

या प्रकरणी बर्दापूर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघे अटकेत असून संतोष उदार हा फरार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष साबळे, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर, तुळशीराम जगताप, पोह.रामदास तांदळे, मारोती कांबळे, विकास राठोड, बाळकृष्ण जायभाय, राजू पठाण, अर्जुन यादव, भागवत शेलार, बिभीषण चव्हाण, अतुल हराळे, महिला पोलीस अंमलदार स्वाती मुंडे, सुशीला हजारे यांनी केली.

Advertisement

Advertisement