बीड - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोडवर जिज्ञासा अकॅडमीच्या बाजूला असलेल्या एटीएम समोर (दि.६) रोजी दुचाकीची सामोरा समोर धडक झाली होती. या अपघातात पेठ बीड पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई पदावर कार्यरत असलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला होता. त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते अखेर रात्री उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली.
मागील चार दिवसापूर्वी पेठ बीड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले गणपत पवार (वय अंदाजे ३५) यांच्या दुचाकीचा शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोडवर जिज्ञासा अकॅडमीच्या बाजूला असलेल्या एटीएम समोर अपघात झाला होता. त्यांना बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टराने त्यांना औरंगाबाद येथे हलवण्यास सांगितले. त्यांच्यावर औरंगाबाद येथील सिग्मा रुग्णालयात उपचार चालू होते. प्रकृती गंभीर असूनही त्यांनी तीन चार दिवस परिस्थीशी सामना केला परंतु नियतीला ते मान्य नसेल अखेर रात्री त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांची अंत्यविधी त्यांच्या मूळ गावी काळेगाव येथे आज दुपारी १ वाजता करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे.