Advertisement

तरुण पत्रकाराच्या मृत्यू पाठोपाठ वडीलांचेही कोरोनाने निधन

प्रजापत्र | Monday, 14/12/2020
बातमी शेअर करा

बीड   – मागच्या तीन महिन्यांपूर्वी  पांडुरंग रायकर या तरुण पत्रकाराला कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी रायकर यांना प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आपला जीव गमवावा लागला होता. अशातच रायकरांच्या घरावर पुन्हा एकदा दु:खाचा डोंगर कोसळला असून अवघ्या तीन महिन्यातच रायकर यांचे वडील लक्ष्मण रायकर यांचंही अहमदनगर रुग्णालयात कोरोनाने निधन झालं आहे.
                      श्रीगोंदा तालुक्यात हंगेवाडी येथे लक्ष्मण रायकर हे भाजीपाल्याचा व्यवसाय करत होते. आधीच घरातील मुलगा गेल्याचं आभाळाएवढं दु:ख असताना लक्ष्मण रायकर यांच्या जाण्याने रायकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लक्ष्मण रायकरांच्या पश्चात पत्नी, सून आणि तीन मुली असा परिवार आहे.2 सप्टेंबरला पांडुरंग रायकर यांना कार्डियाक अँम्बुलन्स न मिळाल्याने त्यांना योग्य उपचार मिळाले नाहीत. त्यामुळे वयाच्या 42 व्या वर्षी रायकर यांचा मृत्यू झाला होता.

   हेही वाचा 

Advertisement

Advertisement