बीड दि. ५ (प्रतिनिधी) : दिवंगत आ. विनायक मेटे यांच्या पत्नी तथा सहकार विभागातील सहनिबंधक डॉ. ज्योती लाटकर (मेटे) यांना शासनाने पदोन्नती दिली आहे. त्यांची नियुक्ती पुणे येथे सहकारी संस्थांच्या अप्पर निबंधक म्हणून करण्यात आली आहे.
डॉ. ज्योती लाटकर (मेटे) या सहकार विभागात अधिकारी आहेत. त्या सध्या लातूर येथे विभागीय सहनिबंधक म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांना पदोन्नतीने अप्पर निबंधक करण्यात आले आहे. ही पदोन्नती महत्वाची मानली जाते.
बातमी शेअर करा