बीड - विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभिजीत धराशिवकर यांनी तालुक्यातील घोडका राजुरी शिवारात सोमवारी (दि.3) रोजी रात्रीच्या सुमारास साठा केलेला गुटखा जप्त करत दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी पिंपळनेर ठाण्यात दिलेल्या फिर्यादिनुसार उपनिरीक्षक पतंगे यांना विशेष पोलीस महानिरीक्षक यांना मिळालेल्या माहितीवरून उपअधीक्षक धाराशिवकर यांनी कारवाईस पाठवले. बीड तालुक्यातील घोडका राजुरी शिवारात अशोक धोंडीराम डरपे यांच्या शेडमध्ये विविध प्रकारचा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला 2 लाख 3 हजार 534 रुपयांचा गुटखा आढळून आला. हा गुटखा बाळासाहेब घुमरे (रा. मैंदा ता.बीड) याकडून घेतल्याचे सांगितले. या प्रकरणी दोघांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डरपे अटक असून गुटखा माफिया घुमरे फरार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पतंगे, आगरकर, कोळेकर, पवार, कोळेकर यांनी केली.