बीड: अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करित शिंदे सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून त्यांच्या सोबतच बीडमधून धनंजय मुंडे यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे यापूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते. त्यानंतर मागचे वर्षभर राज्य मंत्रीमंडळात बीड जिल्ह्याला प्रतिनिधित्व नव्हते. आज धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा मंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे धनंजय मुंडे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
बातमी शेअर करा