Advertisement

बीड जिल्ह्याला मंत्रिपदाची संधी ?

प्रजापत्र | Sunday, 02/07/2023
बातमी शेअर करा

बीड : राज्यात अत्यंत वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या असून आजच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अपेक्षित आहे. यात मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळेल असे सांगितले जात असून बीड जिल्ह्यालामंत्रिपदाची संधी मिळू शकते असे खात्रीलायक वृत्त आहे. 
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नुकतीच आपल्या आमदारांची बैठक घेतली आहे. या बैठकीला राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार उपस्थित असून बैठक संपल्यावर अजित पवार राजभवनात जाणार असल्याचीही माहिती आहे. तर दुसरीकडे आज संध्याकाळी किंवा उद्या मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. यात अनेक नवे चेहरे मंत्रिमंडळात येणार असून मागच्या काही दिवसात राज्य मंत्रिमंडळात बबीड जिल्ह्याला प्रतिनिधित्व मिळालेले नव्हते मात्र यावेळी बीड जिल्ह्यातील एक नेता मंत्री म्हणून शपथ घेणे अपेक्षित मानले जात आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. 

Advertisement

Advertisement