बीड दि. २९ (प्रतिनिधी)-औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेशावर चव्हाण यांनी एपीआय दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात बीड जिल्ह्यात गणेश मुंडेंसह ४ एपीआय येणार आहेत तर जिल्ह्यातील तब्बल ६ एपीआय इतर जिल्ह्यात बदलून गेले आहेत.
बीड जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आलेल्या एपीआयमध्ये गणेश मुंडे,सुभाष सानप, प्रल्हाद जाधव,सतीश कोतकर यांचा समावेश आहे. तर जिल्ह्यातून बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांमध्ये शरद भुतेकर,मारोती मुंडे,श्यामकुमार डोंगरे,रवींद्र शिंदे, प्रदीप एकशिंगे,प्रताप नवघरे यांचा समावेश आहे.आता जिल्ह्यात नव्याने बदलून आलेल्या अधिकाऱ्यांना जिल्ह्यात नेमकी कोठे नियुक्ती मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
बातमी शेअर करा