बीड - अखेर पावसाला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली असून शहरासह बऱ्याच तालुक्यात आज सायंकाळी पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने सांगितलेल्या अंदाज प्रमाणे पाऊस काही भागात हलक्या स्वरूपात तर काही भागात मुसळधार पडत असल्याचे चित्र आहे.
मागील महिन्यात हवामान खात्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडेल असे सांगितले होते. परंतु असे झाले नाही या उलट जूनच्या अखेरीस राज्यात पाऊस दाखल झाला. ज्या पाऊसाची शेतकरी राजा आतुरतेने वाट पाहत होता तो आज बीड शहरासह बऱ्याच तालुक्यात चांगल्या प्रकारे दाखल झाला आहे. आज पडलेल्या पाऊसाने तरी बळीराजा सुखावेल असेच वाटत आहे.
बीड जिल्ह्यात लाखो कुटुंब आपला उदरनिर्वाह शेती व्यवसायातून भागवितात त्याच्या मुळे आज झालेल्या पावसाने सर्व शेतकरी वर्गात व उन्हाने त्रस्त झालेल्या नागरिकात आंनदाचे वातावरण दिसून येत आहे.
बातमी शेअर करा