Advertisement

आषाढीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा बीडच्या मुस्लिम बांधवांचा ऐतिहासिक निर्णय

प्रजापत्र | Sunday, 25/06/2023
बातमी शेअर करा

बीड - आषाढी एकादशी आणि बकरी ईद (ईद-उल-अजहा ) एकाच दिवशी येत आहे. त्या पार्श्वभुमीवर एकता, अखंडता आणि एकात्मतेची संस्कृती कायम रहावी. हिंदू-मुस्लीम ऐक्याची पताका सर्वदूर फडकत रहावी म्हणून हिंदू धर्मियांच्या भावनांचा आदर करत बीडमधील जमैतुल कुरैश सामाजिक संघटनेने आषाढी एकादशीमुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे हिंदू-मुस्लीम

एकतेचं नातं आणखी बळकट झालं आहे. मुस्लीम समाजासह जमैतुल कुरैश संघटनेने घेतलेला हा आदर्श निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे.

 

बीड येथील मोमीनपुरा भागातील एका फंक्शन हॉलमध्ये आज दुपारी झालेल्या बैठकीत जमैतुल कुरैश संघटनेने हा ऐतिहासिक निर्णय घेतला. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी येत आहे. बकरी ईदच्या दिवशी मुस्लीम बांधक बकरीची कुर्बानी देतात तर आषाढी एकादशीला उपवास असतो. दोन्ही पवित्र सणांचा अनोखा संगम त्यादिवशी असला तरी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलीसांपुढे, दोन्ही समाजापुढे होते. त्या अनुषंगाने बीडच्या जमैतुल कुरेश संघटनेने स्वतः पुढाकार घेत शहरातील सामाजिक, राजकीय क्षेत्रातील प्रतिष्ठीत व्यक्तींसोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये आषाढी एकादशीमुळे बकरी ईदच्या दिवशी कुर्बानी न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.

या बैठकीस जमैतुल कुरेश संघटनेचे अध्यक्ष रफीक कुरेशी, मुफ्ती अब्दुल्लाह कुरेशी, जावेद कुरेशी, हाजी इकबाल कुरेशी, आलीम कुरेशी, मुजीब कुरेशी, सत्तार कुरेशी, हाफीज जमील , अँड. शेख शफीक, फारूक पटेल, अशफाक इनामदार, जैतुल्ला खान, शेख एजाज, इकबाल , बरकत पठाण, खुर्शीद आलम, आमेर , सादेक अंबानी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Advertisement

Advertisement