अंबाजोगाई - शहरासह तालुक्यात चोरीच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. शनिवार (दि.२४) रोजी घरात प्रवेश करून सोन्यासह नगदी पैश्याची चोरी केल्याची घटना तालुक्यातील कातकरवाडी मध्ये घडली असून पोलिसांकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.
रंगनाथ ज्ञानोबा कातकडे रा.कातकरवाडी, ता.अंबाजोगाई हे पत्नीसह राहतात. शनिवार (दि.२४) रोजी कपाटातील अंदाजे ४ तोळे सोने आणि नगदी खिशातील १५ हजार रुपये आणि पत्नीने ठेवलेले १५ हजार असे एकूण ३० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. घटनेची माहिती समजताच बर्दापूर पोलीस ठाण्याचे एपीआय अशोक खरात यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. आजूबाजूला बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्यात येत आहेत. दरम्यान शहरासह तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बातमी शेअर करा