Advertisement

जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून...,

प्रजापत्र | Tuesday, 20/06/2023
बातमी शेअर करा

सोलापूर - वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत असलेले पंढपूरमधील विठ्ठल रखुमाईचे मंदिर आजपासून 24 तास खुले राहणार आहे. आषाढी वारीनिमित्त मंदिरात येणाऱ्या भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी मंदिर समितीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

विठ्ठल रखुमाईचे पदस्पर्श आणि मुखदर्शन जास्तीत जास्त भाविकांना घेता यावे यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला. आषाढी वारीनिमित्त पंढपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची आणि भाविकांची लाखांमध्ये असते. आज 11 वाजता विठ्ठल रखुमाईचा पलंग काढण्यात आला. आषाढी वारी संपेपर्यंत देव झोपायला जात नाहीत अशी प्रथा आहे. त्यामुळे भाविकांच्या सोयीसाठी मंदिर चोवीस तास खुले ठेवण्यात येणार आहे.

 

मंदिरातील कार्यक्रम असा असतो
इतर दिवशी विठुरायांची सकाळी 4 वाजल्यापासून पूजाअर्चना होत असते. यानंतर रात्री 11.30 वाजता पूजा होते. त्यानंतर मंदिर बंद राहते. मात्र, देवाचा पलंग काढल्यामुळे नित्याच्या पूजाअर्चना बंद राहणार आहेत. या वेळेचा भाविकांना उपभोग घेता यावा यासाठी मंदिर प्रशासनाने विठ्ठल- रुक्मिणी मंदिर चोवीस तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

Advertisement