Advertisement

भवानी देवीने इतिहास रचला..

प्रजापत्र | Monday, 19/06/2023
बातमी शेअर करा

सीए भवानी देवी हिने तलवारबाजीमध्ये इतिहास रचलाय. आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने सध्याच्या वर्ल्ड चॅम्पियनचा पराभव करत भारताची मान उंचावली आहे. आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने एक पदक पक्के केलेय. या स्पर्धेत पदक पक्कं मिळवणारी भवानी देवी पहिली भारतीय तलवारबाज ठरणार आहे. टोक्यो ऑलम्पिकमध्येही भवानी देवीनं शानदार कामगिरी केली होती, पण पदक मिळवण्यात तिला अपयश आले होते. 

आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानी देवीने प्रभावी कामगिरी केली. क्वार्टर फायनलमध्ये भवानी देवीने जपानच्या मिसाकी इमूरा हिचा 15-10 च्या फरकाने पराभव करत उपांत्य फेरीत आपली जागा पक्की केली. मिसाकी इमूरा तलवारबाजीत वर्ल्ड चॅम्पियन आहे. हिचा पराभव करत भवानी देवीने जगभरात देशाची मान उंचावली. या विजयासह आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भारताचे पदक पक्के झालेय. भवानी देवीने आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. भवानी देवीने संपूर्ण सामन्यात वर्ल्ड चॅम्पियनवर वर्चस्व मिळवले.  मिसाकीला तिने सामन्यात कमबॅक करण्याची संधी दिलीच नाही.  

आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये भवानीचे प्रदर्शन दमदार -

भवानी देवीचं आशियाई फेसिंग चॅम्पियनशीपमध्ये आतापर्यंत दमदार प्रदर्शन राहिलेय. क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी  भवानी देवीने जापानच्या सिरी ओजाकी हिचा 15-11 असा पराभव केला होता.  सिरी 2022 वर्ल्ड चॅपियनशिपमध्ये ब्रॉन्ज पदक जिंकणाऱ्या संघाची सदस्य होती. भवानी देवीने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केलेय. 

टोक्यो ऑलम्पिकमध्ये पदक हुकले -

टोक्यो ऑलम्पिकमध्येही भवानी देवीनं शानदार कामगिरी केली होती, पण पदक मिळवण्यात तिला अपयश आले होते. भवानी देवीच्या कामगिरीने देशभरातील नागरिक आनंदी होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भवानी देवीचे कौतुक केले होते. आठ वेळा नॅशनल चॅम्पियन असणाऱ्या भवानी देवीनं कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप टीम इवेंट्समध्ये एक सिल्वर आणि एक कांस्य पदक जिंकलं होतं. तर याच चॅम्पियनशिपच्या इंडिव्ह्युजअल इवेंटमध्येही भवानीच्या नावावर एका कांस्य पदक आहे. भवानी देवीनं 2010 च्या एशियन तलवारबाजी चॅम्पियनशिपमध्येही तिनं कांस्यपदक जिंकलं होतं.

Advertisement

Advertisement