मराठी मनोरंजन विश्वातुन अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शांता तांबे (Shanta Tambe) यांचे निधन झाले. वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मराठी नाटकांमधून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या शांता तांबे यांनी अनेक नाटकांमधून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच मनोरंजन केलं होत. शांता तांबे यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.
त्यांनी अनेक चित्रपटातुनही प्रेक्षकांच मनोरंजन केले आहे. 'मोहित्याची मंजुळा', 'मर्दानी', 'सवाल माझा ऐका' , 'आई पाहिजे' 'बाई मोठी भाग्याची', 'मोलकरीण', 'दोन बायका फजिती ऐका' अशा चित्रपटांमधुन त्यांनी अभिनयाची छाप सोडली.
7 दशकं त्यांनी अभिनय क्षेत्र गाजवलं. त्यानंतर उतरत्या वयामुळे त्यांनी अभिनय क्षेत्रातुन ब्रेक घेतला. त्या कोल्हापूरातील त्यांच्या घरी राहत होत्या. त्या अलीकडेच तुझ्यात जीव रंगला या मालिकेत दिसल्या. या मालिकेत त्यांनी छोटी भूमिका साकारली होती. शांता तांबे यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.