गेवराई - तालुक्यात सतत वाळू उपसा चालू असतांना पुन्हा आज (दि.१७) रोजी महसूल विभागाने जळगाव नागरे वस्तीवर वाळू घेऊन जाणारा हायवा पकडून कारवाई केली.
तालुक्यातील जळगाव नागरे वस्तीवरून अवैधरित्या हायवाद्वारे वाळू नेत असल्याचे माहिती गुप्त बातमीदारांकडून मिळाल्यानंतर लगेचच तहसीलदार संदीप खोमणे, जितेंद्र लेंडाळ, पखाले, मंडळ अधिकारी किरण दांडगे, निखिल तपसे, अक्षय डोके, माणिक पांढरे, शुभम गायकवाड, विठ्ठल सुतार, गजानन शिंगणे, कुंदन काळे यांनी हायवा पकडून (दि.१७) कारवाई केली. सदरील कारवाई संगम जळगाव नागरे वस्ती या ठिकाणी करण्यात आली.
बातमी शेअर करा