Advertisement

चौकशीसाठी आणलेल्या संशयित व्यक्तीचा पोलिस ठाण्यातच मृत्यू

प्रजापत्र | Wednesday, 14/06/2023
बातमी शेअर करा

परळी - परळी पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यातील दोन व्यक्तींना चौकशीसाठी संशयित आरोपी म्हणुन ताब्यात घेण्यात आलेल्या एका व्यक्तीचा ठाण्यातच मृत्यू झाला असल्याचा आरोप मयताच्या मुलाकडुन करण्यात आला आहे.या घटनेमुळे काही काळ पोलिस स्टेशन परिसरात तणाव निर्माण झाला होता.

 

परळी पोलिसांकडून चोरीच्या गुन्ह्यातील दोन व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. सदरील व्यक्तीला पोलिसांनी परळी उपजिल्हा रुग्णालय मध्ये घेऊन गेले यावेळी डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मयत घोषित केले आहे.व्यक्तीच्या मुलाने आरोप केलाय की, माझ्या वडिलांना व मला परळी पोलिसांनी चौकशीसाठी परळी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन आले आणि चौकशी दरम्यान मला व माझ्या वडिलाला निर्दयीपणे मारहाण करीत विचारपूस करीत होते यामध्ये माझ्या वडिलांचे पोलीस स्टेशन मध्येच मृत्यू झाला. असा आरोप मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक करीत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी जमलेल्या जमावाशी संवाद साधत परिस्थिती नियंत्रणात आणली, अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. 

Advertisement

Advertisement