Advertisement

बीडमध्ये उद्या निघणार महाविकासआघाडी व समविचारी पक्ष,संघटनांचा भव्य मूक मोर्चा

प्रजापत्र | Sunday, 11/06/2023
बातमी शेअर करा

बीड दि.११ (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा.शरद पवार व शिवसेना (उबाठा) चे खा.संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहेत.राज्यभरातून अश्या माथेफिरूविरोधात संतापाची लाट निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.उद्या (दि.१२) बीडमध्ये महाविकास आघाडी आणि   समविचारी पक्ष,संघटनांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मूक मोर्चा काढण्यात येणार असून यात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर यांनी केले. 

 

      राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ठार मारण्याची धमकी मिळाल्‍यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच त्यांना धमकी देणारा हा अमरावतीतील भाजपाचा कार्यकर्ता असल्याची माहिती समोर आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या तरुणाने ट्विटरवरून पवारांना धमकी दिली. तेव्हापासून सौरभ पिंपळकरचा पोलीस शोध घेत असल्याचे सांगितले जाते. मात्र शरद पवार यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचे काम भाजपच्या वतीने सुरु असून खा.संजय राऊत यांना देखील धमकीचे पत्र देण्यात आले आहे.त्यामुळे या धमकीचा जाहीर निषेध करण्यासाठी महाविकास आघाडी,समविचारी पक्ष व संघटनाकडून मुक मोर्चा उद्या (दि.१२ )सकाळी १० वाजता छञपती शिवाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय काढण्यात येणार आहे.या मोर्च्यात आ.धनंजय मुंडे,आ.प्रकाश सोळंके,आ.सतिश चव्हाण,आ.विक्रम काळे, माजी आमदार अमरसिंह पंडित,आ.बाळासाहेब आजबे,आ.संदिप क्षीरसागर,माजी आ.राजेंद्र जगताप, माजी आमदार उषा दराडे,माजी आमदार,माजी आमदार सलीम सय्यद,माजी आमदार पृथ्वीराज साठे,माजी आमदार संजय दौंड,महेबुब शेख,कल्याण आखाडे,डाॅ.नरेंद्र काळे,बजरंग सोनवणे,राजकिशोर मोदी,राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष ॲड.राजेश्वर चव्हाण,सुशीला मोराळे,राजेसाहेब देशमुख,अनिल जगताप,रत्नाकर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान या मोर्च्यात हजारोंच्या संख्येने संख्येने सहभागी व्हा असे आवाहन  राष्ट्रवादीचे युवक जिल्हाध्यक्ष विजयसिंह बाळा बांगर यांनी केले आहे. 
 

Advertisement

Advertisement