Advertisement

लिंबागणेश महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर धाडसी दरोडा

प्रजापत्र | Sunday, 11/06/2023
बातमी शेअर करा

नेकनुर - दि.११ लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर धाडसी दरोडा टाकल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.साडे बारा लाखाचा ऐवज लंपास करण्यात आला आहे . या घटनेने खळबळ माजली असून ठसे तज्ञासह श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

 

      तूका विप्र देवस्थान मंदिरावर दरोडा पडल्यानंतर चौसाळ्यासह नेकनूर शहरात चोरी व दरोड्याच्या घटना घडू लागल्या.नेकनूर चे सपोनि शेख मुस्तफा यांचा गुन्हेगाराबद्दल असलेला उदारमतवादी दृष्टिकोन जनतेच्या मुळावर येऊ लागल्याने कायदा सुव्यवस्था कोलमडली आहे. गुन्हेगारांसाठी नेकनूर पोलीस ठाणे हद्द नंदनवन बनल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एक भर  मांजरसुंबा- पाटोदा महामार्गावर असलेल्या लिंबागणेश येथील बसस्थानक स्थित बँकेत धाडसी दरोडा पडल्याचा प्रकार आढळून आला आहे. शनिवार दि. दहा जूनच्या मध्यरात्री लिंबागणेश येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या पाठीमागील बाजुने लोखंडी शिडीवरून चढून गॅस कटरच्या सहाय्याने लोखंडी खिडकीचे गज तोडुन आत प्रवेश केला व स्ट्राॅंगरूम कटरने फोडुन बँक मॅनेजर प्रणव कापसे यांच्या म्हणण्यानुसार अंदाजे साडे बारा लाख रोख रक्कम व काही सोने चोरीला गेले आहे.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नेकनुर पोलिस स्टेशनचे सपोनि शेख मुस्तफा, उपनिरीक्षक विलास जाधव, शेख लिंबागणेश पोलिस स्टेशनचे पो.ह.सचिन डिडुळ,नवनाथ मुंडे घटनास्थळी दाखल झाले असुन वरीष्ठांना कल्पना दिली असुन घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखा, श्वानपथक व ठसेतज्ञांना पाचारण केले आहे.
 

Advertisement

Advertisement