आष्टी - अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून टाॅवरच्या बॅटऱ्या चोरून त्याची अहमदनगर शहरात विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी टोळीतील तीन जणांना बुधवारी (दि.७) रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील चिंचेवाडी येथील बीएसएनएल टाॅवर च्या ६५ हजार रूपये किमतीच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याचा १७ मे २०२३ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून अंभोरा पोलिस आरोपींच्या शोधत होते.तालुक्यातील नांदुर विठ्ठलाचे येथील तीन जणांनी ही चोरी केल्याची माहिती अंभोरा पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फॅत समजाताच त्यांनी आरोपी सोपान वाघुले,सुखदेव खिळदकर, विनोद खिळदकर, रा.नांदुर विठ्ठलाचे ता.आष्टी, यांना बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्हा केल्याची कबुली दिल्याने अटक करण्यात आली. किती ठिकाणी चोऱ्या केल्या याची चौकशीअंती उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे,पोलिस उपनिरीक्षक रवि देशमाने,आदिनाथ भडके,अंमलदार उध्दव गडकर, शिवदास केदार, अमोल शिरसाठ, रविंद्र राऊत, सतिश पैठणे यांनी केली.