बीड-राज्यात या वर्षी बिबट्यांचा लोक वस्तीतळावर वावर वाढला आहे.या वर्षात बिबट्यांच्या हल्ल्यात ३० जणांना आपला जीव गमवावा लागला असून वन विभागाची ही आकडेवारी आहे.तसेच यावेळी १५९ बिबट्यांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यु झाला.राज्यातील अनेक जिल्यातील शेतकऱ्यांची बिबट्याच्या भितीनं झोप उडाली आहे.
बिबट्या नुसतं नाव ऐकलं तरी अंगाचा थरकाप उडतोय. औरंगाबाद, बीड, सोलापूर, अहमदनगर यासह अन्य जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या वावराने लोक दहशतीखाली आहेत. आष्टी तालुक्यात चिमुकल्याला डोळ्यादेखत बिबट्याने उचलून नेलं. औरंगाबादेत बापलेकांचा शेतात बिबट्याने फडशा पाडला. बिबट्यांना या वर्षात थोड्या-थोडक्या नाही तर ३० लोकांचा बळी घेतला आहे.
धक्क्दायक म्हणजे गेल्या पाच वर्षांची आकडेवारी पाहता यावर्षी आतापर्यंत १५९ बिबट्यांनी सुद्धा आपला जीव गमावला आहे. वनविभागाच्या माहितीनुसार ८० बिबट्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे. ६४ बिबट्यांचा रस्ता ओलांडतांना रेल्वे क्रॉसिंग ओलांडतांना मृत्यु झाला,तर २ बिबट्यांची शिकार झाली असून १३ बिबटे अज्ञात कारणाने मृत पावले.दरम्यान मागील दहा वर्षात यंदा प्रथमच बिबट्याच्या हल्ल्यात मानवाचे सर्वाधिक मृत्यु झाले आहेत.