Advertisement

ओडिसामध्ये पुन्हा रेल्वे अपघात

प्रजापत्र | Monday, 05/06/2023
बातमी शेअर करा

ओडिसामध्ये शुक्रवारी झालेल्या रेल्वे अपघातात २७५ पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. या घटनेनंतर रेल्वेतील सिग्नल यंत्रणेचे वाभाडे निघत आहेत. विरोधकांनी केंद्र सरकारला धारेवर धरलं आहे. यातच आता आणखी एक रेल्वे अपघात ओडिसामध्ये झाल्याचं समोर येतंय.

 

ओडिसातील बारगढ जिल्ह्यामध्ये असलेल्या मेंधापाली येथे एका मालगाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात रेल्वेचे पाच डबे रुळावरुन घसरले. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झालेली नाही.

 

एएनआयने यासंबंधी एक ट्वीट केलं आहे. इस्ट कोस्ट रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार मेंझापालीजवळ एका सिमेंट फॅक्ट्रीजवळ हा अपघात झाला. मालगाडीचे काही डबे फॅक्ट्री परिसरात घसरले. यामध्ये रेल्वेचा संबंध नसल्याचं सांगण्यात आलेलं आहे.

 

दरम्यान, ओडिसामध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर तब्बल 51 तासांनी बालासोर येथील अपघातग्रस्त भागातून पहिली ट्रेन रवाना झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मालगाडीला हिरवा झेंडा दाखवला आहे. ही मालगाडी विशाखापट्टणम बंदरातून राउरकेला स्टील प्लांटकडे जात होती. तसेच, ज्या रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी भीषण अपघात झाला होता, त्याच रेल्वे ट्रॅकवरुन ही मालगाडी रवाना झाली.

 

रेल्वेमंत्री भाऊक
माध्यमांशी बोलताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना अश्रू अनावर झाले. 'बेपत्ता लोकांच्या कुटुंबियांना लवकरात लवकर त्यांच्या नातलगाला भेटता यावे, हा आमचा उद्देश आहे. ते लवकरात लवकर मिळावेत. आमची जबाबदारी अजून संपलेली नाही, असं रेल्वेमंत्री म्हणाले.

Advertisement

Advertisement