Advertisement

१० हजाराची लाच घेताना ग्रामसेवक पकडला

प्रजापत्र | Wednesday, 31/05/2023
बातमी शेअर करा

बीड दि.३१ - पाटोदा येथे शेतकर्‍याकडून कांदा चाळीच्या अनुदानासाठी दीड हजाराची लाच घेताना अतिरिक्त पदभार असलेला कृषी सहायक रंगेहाथ पकडला. या प्रकरणात गुन्हा दाखल होत नाही तोच वडवणी तालुक्यातील ढोरवाडी येथे १० हजाराची लाच घेताना ग्रामसेवकाला पकडण्यात आले आहे. हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (दि.३१) रोजी  केली आहे. 
वसंत बळवंतराव जांभळे असे लाचखोर ग्रामसेवकाचे  नाव आहे. १० हजार रुपयांची लाच स्विकारताना वसंत जांभळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे, अपर अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद येथील एसीबीच्या टिमने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जांभळे यांच्याकडे वडवणी खापुरवाडी, हिवरगव्हण, ढोररवाडी येथील गावांचा पदभार होता. दिवसभरात दोन लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने जिल्ह्यात लाचखोरी किती वाढली आहे हे दिसून येत आहे.

Advertisement

Advertisement