नांदूर घाट दि.३० (प्रतिनिधी) - शेततळ्यात १८ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याची घटना घटना केज तालुक्यातील नांदूर घाट गावालगत असलेल्या खोमणवाडी शिवारात आज मंगळवार (दि.३०) रोजी दुपारी चार च्या सुमारास घडली.
नांदूर घाट येथील रहिवाशी असलेला धीरज महादेव जाधव (वय १८) हा युवक गेल्या दोन दिवसापासून बेपत्ता होता.सदरील युवकाचा मृतदेह हा मंगळवार (दि.३०) रोजी दुपारी चार च्या सुमारास गावालगतच असलेल्या खोमणवाडी शिवारातील शेततळ्यात आढळून आला. तो तरुण मानसिकदृष्ट्या मतिमंद व भोळसर असल्याचे बोलले जात आहे. या मागचे कारण प्रथमदर्शी तरी स्पष्ट झाले नव्हते. घटनास्थळी नांदूर घाट येथील पोलीस चौकीचे मेसे हजर होते.
बातमी शेअर करा