Advertisement

कापसाला भाव नसल्याने तरुण शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

प्रजापत्र | Saturday, 27/05/2023
बातमी शेअर करा

वडवणी - यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल या आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आसुन सध्या शेतकऱ्यांच्या कोणत्याच पिकाला भाव नाही व शेतकऱ्यांच पांढरं सोनं म्हणुन समजल्या जाणाऱ्या कापसाला कवडी मोल भाव असल्याने मेहनत तर सोडा साधा खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.आपण घेतलेलं कर्ज कसं फेडाव संसाराचा गाडा कसा चालवावा या विवंचनेतुन मोरेवाडी येथील तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील आंब्यांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आसुन तालुक्यात केंद्र सरकारच्या विरोधात सोषल मिडीया च्या माध्यमातुन शेतकरी रोष व्यक्त करत आहेत.

       शेतकऱ्यांनी अफाट मेहनत व खर्च करून कापूस जोमात आणला सुरुवातीला कापसाला नऊ हजाराच्या पुढे भाव असल्यामुळे शेतकर्‍यांना यावर्षी कापसाला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकर्‍यांनी शेतातील संपूर्ण कापूस आपल्या घरातच साठवून ठेवला आहे.केंद्र सरकार च्या चुकीच्या कापुस आयात धोरणामुळे संपुर्ण शेतकरी भरडला गेला आहे.सध्या व्यापारी व कापूस खरेदी केंद्र चालक सहा हाजार पाचसे च्या आसपास कापुस खरेदी करीत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केलेली मेहनत तर सोडाच साधा खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला असल्याने शेतकरी संपुर्णतः हवालदिल झाला असून याकडे केंद्र सरकारने दुर्लक्ष केले आहे.शेतकऱ्यांच्या या गंभीर बाबीकडे कुणीच आवाज उठवायला तयार नसल्यामुळे शेतकरी राजा हा असे टोकाचे पाऊल उचलत आहे. तालुक्यातील सर्व शेतकर्‍यांचा रोष हा केंद्र सरकारवर शेतकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त करत असल्याचा पहावयाला मिळत आहे. आशीच दुर्दैवी घटना वडवणी तालुक्यातील मोरेवाडी येथील शेतकरी वचिष्ठ आश्रुबा मुंडे वय ३५ यांनी 

 कर्ज बाजारी व घसरत्या कापूस भावाला कंटाळून आपल्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.त्यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कर्ज असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले आहे.

त्यांच्यावर त्यांच्या शेतामध्ये मोठ्या जड अंतकरणाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पच्यात वयोवृद्ध आई, पत्नी,छोटा मुलगा,एक छोटी मुलगी असा परिवार असून गावातील तरुण युवक गेल्याने सर्वत्र हळहळ केली जात आहे.

Advertisement

Advertisement