Advertisement

अमळनेर ग्रामपंचायत कार्यालयाला महिलांकडून कुलूप

प्रजापत्र | Saturday, 27/05/2023
बातमी शेअर करा

 

अमळनेर - पाटोदा तालुक्यातील अमळनेर येथील ग्रामपंचायत अंतर्गत बेदरे वस्ती गोविंद नगर व पोकळे वस्ती या वस्तीवरील जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा अंदाजपत्रकांमधून वगळण्यात आलेले आहे त्यामुळे वारंवार महिलांनी तेथील लोकप्रतिनिधींना सांगून देखील काही फायदा होत नसून त्यामुळे या कामाकडे दुर्लक्ष केले जात होतं त्यामुळे संतप्त महिलांनी आज सकाळी दहा वाजता तब्बल 50 ते 100 महिलांनी एकत्रित येऊन ग्रामपंचायत कार्यालय गाडले कार्यालय मध्ये येऊन ग्रामपंचायत कार्याचा निषेध करत हांडे व माठ तेथे फोडले गेले व घोषणा दिल्या आणि कार्यालयाला कुलूप लावले

Advertisement

Advertisement