नेकनूर - वयोवृद्धाच्या डोक्यात दगड टाकून निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मुळुकवाडीपासून काही अंतरावर असलेल्या कवडेवाडी येथे आज सकाळी उघडकीस आली.
सदरील घटनेची माहिती अशी कि, गोरख सीताराम ढास (वय-७०) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आज पहाटे जेव्हा त्यांच्या पत्नीला गोरख ढास हे घरात दिसून आले नाही तेव्हा त्यांनी घराबाहेर पाहिले असता घराच्या पाठीमागील बाजूस त्यांचा मृतदेह आढळून आला.यावेळी घटनास्थळावर एक मेलेली कोंबडी, कोंबडीचे अंडे आढळून आले आहेत. सदरची हत्या ही अघोरी जादूटोण्यातून झाली आहे का? असा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती नेकनूर पोलिसांना मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुस्तफा शेख, उपनिरीक्षक विलास जाधव, पो.कॉ. प्रशांत क्षीरसागर, अनिल राऊत, सचिन डिढूळ, नागरगोजे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांनी घटनास्थळाला भेट दिली असून गोरख ढास यांच्या मारेकर्यांचा शोध पोलीस घेत आहेत.