बीड - एका ५० वर्षीय महिलेने बिंदुसरेच्या धरणात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे.
जिजाबाई जोगदंड (वय-५०) रा.वासनवाडी असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सदरील महिलेच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता. हा प्रकार काही लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर लोकांनी या महिलेस पाण्याच्या बाहेर काढले असता सदरील महिला मयत झाली होती.या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
बातमी शेअर करा