Advertisement

नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नाही; सरकार असं चालतं का?

प्रजापत्र | Saturday, 20/05/2023
बातमी शेअर करा

२ हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्यात येत असल्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी अचानक जाहीर केला. या नोटा बदलून घेण्यास अथवा बँकेत जमा करण्यास नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 

८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा एका रात्रीत बंद केल्या होत्या. त्यावेळीही नोटा बदलून घेण्यास वेळ दिला होता. यावेळी २ हजारांच्या नोटेच्याबाबतीत मात्र नोटा थेट बंद न करता ही नोट ३० सप्टेंबरपर्यंत चलनात कायम ठेवली आहे. तोवर त्या बँकांत जमा करता येतील. ३० सप्टेंबरनंतर काय? याबाबत आरबीआयने अद्याप काही म्हटलेले नाही.

आरबीआयच्या या निर्णयानंतर आरोप-प्रत्योराप सुरू झाले. यामध्ये विरोधकांकडून मोदी सरकारवर निशाणा साधला जात आहे. याचदरम्यान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. हा धरसोडपणा आहे. तज्ज्ञांना विचारुन हा निर्णय झाला असता तर ही वेळ आली असती, असं राज ठाकरेंनी सांगितले. राज ठाकरे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

राज ठाकरे पुढे म्हणाले की, आता लोकांनी परत बँकेमध्ये पैसे टाकायचे, परत तुम्ही नवीन नोटा आणणार, असं सरकार चालतं का? असे प्रयोग होतात का?, असा निशाणा राज ठाकरेंनी लगावला. त्यावेळी जेव्हा नोटा आणल्या होत्या तेव्हा त्या एटीएममध्येही जात नव्हत्या. म्हणजे नोटा एटीएममध्ये जात आहेत की नाहीत हे देखील पाहिलं नव्हतं. नोटबंदीसारखे निर्णय देशाला परवडणारे नसतात, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Advertisement

Advertisement