Advertisement

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्‍यांचे सत्र सुरुच

प्रजापत्र | Wednesday, 17/05/2023
बातमी शेअर करा

बीड - शहरातील शांतई हॉटेलच्या पाठीमागे असलेल्या एका बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने कपाटातील रोख रक्कम २१ हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलिसात अज्ञात चोरट्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. 
        दत्ता पुरी हे नातेवाईकाच्या अंत्यविधीला गेल्याने त्यांच्या घरी कोणी नव्हते. याच संधीचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. घरातील नगदी २१ हजार रुपये चोरून नेले. परत आल्यानंतर पुरी यांना आपल्या घरामध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज कुठे ना कुठे चोरीची घटना घडू लागल्याने नागरिकांसह व्यापार्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Advertisement

Advertisement