बीड - वैद्यकीय क्षेत्रात करियर करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे बीडमध्ये हाय टेक एज्युकेशन क्लासेसचे अनिल व सुनील राऊत या बंधूंनी बीडमध्ये रविवारी (दि.१४) एमबीबीएस आणि बीएएमएसच्या पूर्वतयारीसाठी मार्गदर्शन सेमिनार आयोजित केला आहे.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती येणार आहेत.हे शिबीर विद्यार्थ्यांसाठी मोफत असून याचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन राऊत बंधूंच्या वतीने करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेश 'हाय टेक' मुळे सुखकर झाले आहेत.मागच्या चार-पाच वर्षात जवळपास ५०० विद्यार्थ्यांना कमी गुण असतानाही हायटेकने खात्रीशीर प्रवेश मिळवून दिले .केवळ बीड जिल्हाच नव्हे तर मराठवाडा आणि राज्यात हायटेक एज्युकेशन मार्गदर्शन केंद्राचा नावलौकिक वाढला आहे.विद्यार्थांकडून नाममात्र शुल्क आकारत हायटेकने आपली विश्वासाहर्ता जपली असल्याने दिवसेंदिवस या मार्गदर्शन केंद्राकडे विद्यार्थांचा कल वाढत जात आहे.दरम्यान एमबीबीएस आणि बीएएमएसच्या प्रवेश पूर्वतयारीसाठी विद्यार्थाना अचूक मार्गदर्शन व्हावे यासाठी मोफत सेमिनारचे आयोजन करण्यात आले असून रविवारी (दि.१४) उमाकिरण शैक्षणिक संकुल,हायटेक एज्युकेशन मार्दर्शन केंद्रामध्ये डॉ.प्रवीण दोरखे (रेडिओलॉजिस्ट रुबी हॉस्पिटल पुणे,मेडिकल कौन्सलरविजेते इन रशिया),डॉ.शैलेश कांचन (एमबीबीएस,डीएनबी मेडिसिन),डॉ.अमेय नारकर (एमबीबीएस),डॉ.जानवळे (एमबीबीएस),सुनील राऊत (उत्कृष्ट मेडिकल कौन्सलर,विजेते इन मराठवाडा) मार्गदर्शन करणार आहेत.सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत चालणाऱ्या या सेमिनारचा विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन राऊत बंधुंच्या वतीने करण्यात आले आहे.
वैद्यकीय क्षेत्रातील विश्वासहर्ता जपायची-राऊत अलीकडच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील स्पर्धा प्रचंड जीवघेणी ठरू लागली आहे.विद्यार्थाना वैद्यकीय प्रवेश मिळण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.त्यामुळे आम्ही मागच्या काही वर्षांपूर्वी हायटेकची स्थापना केली.आज या मार्गदर्शन केंद्रातून केवळ पैसे कमविणे हा आमचा हेतू नसून वैद्यकीय क्षेत्रातील विश्वासहर्ता जपणे आमच्यासाठी महत्वाचे आहे.त्यामुळे आम्ही रविवारी बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत सेमिनार आयोजित केला असून याचा अधिकाधिक संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन अनिल व सुनील राऊत बंधूंच्या वतीने करण्यात आले आहे.