Advertisement

छताच्या पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत तरुणाची आत्महत्या

प्रजापत्र | Saturday, 13/05/2023
बातमी शेअर करा

चौसाळा दि.१३ (वार्ताहर) सतत होणार्‍या आजारपणाच्या त्रासाला कंटाळून तसेच नैराश्यातून सुतार काम करणाऱ्या कारागिराने आपल्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना शनिवार (दि.१३) रोजी सकाळी उघडकीस आली. 
              परमेश्वर चंद्रसेन पिंपळे (वय-४०) चौसाळा ता.बीड हा तरुण फर्निचरच्या दुकानात कारागीर होता. त्याने आपल्या सततच्या आजार पणाला विशेषतः नैराश्यातून व आजारपणाच्या त्रासातून आपल्या राहत्या घरी छताच्या पंख्याला दोर लाऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हा तरुण मजुरी करून आपला उदरनिर्वाह भागवत होता. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे. चौसाळा पोलीसांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास करत आहेत. 

Advertisement

Advertisement