Advertisement

कर्नाटकात काँग्रेसचे स्पष्ट बहुमत

प्रजापत्र | Saturday, 13/05/2023
बातमी शेअर करा

कर्नाटक विधानसभेच्या २२४ मतदारसंघांसाठी १० मे रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (१३ मे) होत आहे. मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष काँग्रेसच्या बाजूचे होते. तोच कल आता मतमोजणीतही दिसून आला आहे. हा कल शेवटपर्यंत असाच राहिल्यास काँग्रेस बहुमताचं सरकार स्थापन करेल आणि यासह सलग एकाच पक्षाकडे सत्ता न देण्याची कर्नाटकातील ३८ वर्षे जुनी परंपरा कायम राहिली. या निकालाबद्दल देशभरात उत्सुकता पाहायला मिळत आहे.

 

 

NDTV वृत्तवाहिनीनुसार कोण किती जागांवर आघाडीवर?

काँग्रेस –१३०

भाजपा –६६

जेडीएस –२२

इतर –०६

Advertisement

Advertisement