बीड-येथील मंत्री मशनरीचे मालक दिलीप प्रेमसुख मंत्री यांचे बुधवारी (दि.९ )सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.मृत्युसमयी ते ५३ वर्षांचे होते.औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात त्यांना अस्वस्थ वाटु लागल्याने दोन दिवसापूर्वी दाखल करण्यात आले होते.आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.सायंकाळी पाच वाजता मोंढा भागातील अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दिलीप मंत्री हे पिंपळनेरचे मूळ रहिवाशी होते.त्यांनी आपल्या व्यवसायातून अनेक शेतकर्यांना मदत केली.माहेश्वरी प्रगती मंडळाचे ते बीडचे माजी अध्यक्ष राहिले होते. तसेच सध्या माहेश्वरी महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य म्हणून ते काम पाहत होते.प्रतिष्ठित व्यापारी म्हणून त्यांच्याकडे पाहितलं जात होतं. त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असून आज सायंकाळी ५ वाजता मोंढा भागातील मुक्तीधाममध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असून सारडा रेसीडन्सीमधून त्यांची अंत्ययात्रा निघणार असल्याची माहिती आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, पत्नी, मुले असा परिवार आहे. मंत्री परिवाराच्या दु:खात प्रजापत्र परिवार सहभागी आहे.
हेही वाचा