Advertisement

कर्नाटकात काँग्रेस-भाजपमध्ये ‘काँटे की टक्कर’

प्रजापत्र | Wednesday, 10/05/2023
बातमी शेअर करा

कर्नाटक (Karnataka 2023) विधानसभा निवडणुकीतील २२४ जागांसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झालं आहे. या जागांसाठी मतदान संपलं असून आता १३ मे रोजी निकाल लागणार आहेत. दरम्यान, आता एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले असून काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर होणार असल्याचं दिसून येतंय. तर दुसरीकडे जेडीएस किंगमेकर ठरण्याचीही शक्यता आहे.  
झी आणि मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यांना १०३-११८ जागा, तर भाजपला ७९-९४ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर एक्झिट पोलनुसार जेडीएसला २५-३३ जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय अन्यच्या खात्याता २ ते ५ जागा जाऊ शकतात.
रिपब्लिक टीव्ही आणि पी पार्कद्वारे कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज बांधण्यात आलाय. यामध्ये सत्ताधारी भाजपला ८५-१००, काँग्रेसला ९४-१०८ आणि जेडीएसला २४-३२ जागा आणि अन्यच्या खात्याता २ ते ६ जागा जाण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

 

tv९ पोल काय म्हणतो?
टीव्ही ९ च्या एक्झिट पोलनुसार राज्यात त्रिशंकू स्थिती निर्माण होऊ शकते अशा शक्यता वर्तवण्यात आल्यात. टीव्ही ९ नुसार भाजपला ८८ ते ९८ जागा, काँग्रेसला ९९ चे १०९ जागा आणि जेडीएसच्या खात्यात २१-२६ जागा जातील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. 

 

तर पोलस्ट्रॅटच्या अंदाजानुसार राज्यात कर्नाटकला ८८-९८, काँग्रेसला ९९ ते १०९ जागा मिळू शकतात असं म्हटलंय. तर जेडीएसच्या खात्यात २१ ते २६ जागा जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

 

दर ५ वर्षांनी सत्ताबदल
कर्नाटकात सत्तेत असलेल्या भाजपला कर्नाटकात दर ५ वर्षांनी सत्ता बदलण्याचा ३८ वर्षांचा ट्रेंड तोडायचा आहे. तर दुसरीकडे काँग्रेस यावेळी पुन्हा सत्तेत येईल असा दावा करत आहे. २०१८ प्रमाणे आपण किंगमेकर ठरू शकतो अशी जेडीएसला अपेक्षा आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

Advertisement

Advertisement