प्रविण पोकळे
करमाळा - चिकलठाण येथील ऊसतोडी मजुराच्या आठ वर्षीय मुलीवर सकाळी साडे अकराच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. तिला करमाळा येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.अशी माहिती करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अमोल डुकरे यांनी सांगितली. फुलाबई हरीचंद कोठले (वय, 8 वर्ष). राहणार दुसाने तालुका साक्री जिल्हा नंदुरबारअसे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या मुलीचे नाव आहे. ही घटना केडगाव शेटफळ सीमेवर असलेल्या जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांच्या शेतात घडली होती. त्यांच्या शेतात आज ऊसतोडणी सुरू होती बाजूलाच ऊसतोडणी कामगारांची मुले खेळत होतीअशातच नरभक्षक बिबट्याने त्यानिष्पाप मुलीवर हल्ला केला यानंतर ऊस तोडणी कामगारांनीत्याने त्याचा पाठलाग केला.बिबटयाला हुसकावून लावले .गेल्या पाच दिवसांत हा तिसरा बळी आहे असे समजते.
बातमी शेअर करा