पंजाबमधील (Punjab) लुधियाना (Ludhiana) येथील गियासपुरा येथील एका फॅक्टरीतून गॅस लीक (Gas Leak) झाल्याने 9 जण ठार झाले आहेत. तसंच 11 जणांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. तसंच डॉक्टर आणि रुग्णवाहिका यांना तात्काळ घटनास्थळी रवाना करण्यात आलं आहे. दरम्यान, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.
बातमी शेअर करा