बीड दि.२३ (प्रतिनिधी)- बीड-पिंपळनेर रोडवर माळस जवळा फाट्यावर एका हॉटेलशेजारी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलीस अधिक्षक यांच्या पथकाने छापा मारून सात जणांना ताब्यात घेतले आहे.यावेळी कारवाईत सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास हजारे,पोलीस शिपाई सचिन काळे, शिवाजी डीसले, विनायक कडू यांनी केली आहे.
शेख शकीर शेख दगडू (रा.पिंपळनेर),नितीन चिंतामण खांडे (रा.पिंपळगाव) दिनकर सुदाम माने (रा.पिंपळगाव),दत्तू दुधाची पवार (रा.गंगनाथ वाडी),प्रकाश मोतीराम कानडे (रा.राजकपूर) सय्यद अफसर अब्दुल (रा.म्हाळ जवळा) विठ्ठल साहेबराव कानडे (रा.रजकपूर) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहेत.हे सात जण जुगार खेळताना आढळून आल्याने पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.या कारवाईत साडेसात हजार नगदी रक्कम तसेच मोबाईल व जुगाराचे साहित्य मोटरसायकल असे २ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.