Advertisement

एकदिवसीय परभावाची भारताकडून परतफेड

प्रजापत्र | Sunday, 06/12/2020
बातमी शेअर करा

ऑस्ट्रेलियाचा टी-२० त सहा गडी राखून केला पराभव 

सिडनी :भारतीय संघाने 3 टी-20 मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 6 विकेट्सनी धूळ चारली. यासोबत भारताने 2-0 मालिका खिशात घातली. विजयासाठी भारतीय संघाने अखेरच्या 10 षटकात 109 धावा केल्या.ऑस्ट्रेलियामध्ये 12 वर्षांपासून टीम इंडियाने द्विपक्षीय टी -20 मालिका गमावली नाही. फेब्रुवारी 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाकडून त्यांच्याच जमिनीवर टी-20 मालिकेत पराभव स्वीकारावा लागला होता.
दोन्ही संघांमध्ये 9 वी टी -20 मालिका खेळली जात आहे
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ही 9 वी टी-20 मालिका खेळली जात आहेत. मागील 8 मालिकांमध्ये भारताने 3 आणि ऑस्ट्रेलियाने 2 मालिका जिंकल्या आहेत. तर 3 ड्रॉ राहिल्या. ऑस्ट्रेलियात दोन्ही संघांमध्ये मागील 4 मालिकांत 11 बरोबरी राहिली आहे तर 2 मालिका ड्रॉ राहिल्या.सिडनी येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक हारून प्रथम फलंदाजी करत 195 धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात भारताने 19.4 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 195 धावा करत सामना खिशात घातला. 

 

Advertisement

Advertisement