आष्टी -आष्टी तालुक्यातील तिघांना शिकार केल्यानंतर नरभक्षक बिबट्याने करमाळा तालुक्यात आपली दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे.तीन दिवसापूर्वी करमाळा परिसरातील महिलेला बिबटयाने पहिले शिकार बनवले होते.त्यानंतर शनिवारी (दि.५) सायंकाळी ७ च्या सुमारास या बिबट्याने दुसऱ्या महिलेलाही ठार मारल्याचे समोर आले.
करमाळा तालुक्यातील फुंदेवाडी नंतर शनिवारी अंजनडोह मध्ये महिलेवर हल्ला करून तिला ठार केल्याची घटना सायंकाळी पावणे सात वाजता घडली.आष्टी तालुक्यात तीन बळी घेतल्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा करमाळा तालुक्यात वळवला.अंजनडोह येथील महिला जयश्री शिंदे (वय-२५) या शेतात लिंब वेचत असताना बिबटयाने त्यांच्यावर झडप मारून त्यांना ठार केले.दरम्यान आष्टी तालुक्यातील वन विभागाने या बिबट्याला ठार मारण्याचा प्रस्ताव वन्य जीव विभागाकडे शनिवारी पाठविला असून सर्व नागरिकांनी काळजी घेण्याची आवाहन केले आहे.
बिबट्यापासून बचावासाठी काय घ्यायची काळजी? वन विभागाचे अधिकारी पाहा काय सांगत आहेत?