Advertisement

भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर अजित पवारांनी अखेर स्पष्ट केली भूमिका

प्रजापत्र | Tuesday, 18/04/2023
बातमी शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यानिमित्ताने सध्या राज्यात राजकीय उलथापालथ सुरु आहे. अजित पवार भाजपात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं असून सर्वच राजकीय पक्षांकडून यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच आता अजित पवारांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे.  माझ्याबद्दल आणि माझ्या सहकाऱ्यांबद्दल गैरसमज पसरवले जात आहे. बातम्यांमध्ये काही तथ्य नाही असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.  

 

 

"माझ्याबद्दल सातत्याने ज्या काही बातम्या पसरवल्या जात आहेत, त्यात अजिबात तथ्य नाही. 40 आमदारांच्या सह्या घेण्याचं काही कारण नाही. आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असून, पक्षातच राहणार आहोत. या बातम्यांना कोणताही आधार नाही. वेगवेगळ्या चॅनेलवर इतर राजकीय पक्षांचे नेते त्यांची मतं व्यक्त करत आहेत, तो त्यांचा आधिकार आहे," असं अजित पवार म्हणाले आहेत. 
 

Advertisement

Advertisement