Advertisement

ऑनलाईन गेममुळे जालन्याचा तरुण देशोधडीला

प्रजापत्र | Friday, 14/04/2023
बातमी शेअर करा

जालना-ऑनलाइन गेमचा जबर झटका जालना जिल्ह्यातल्या ढगी गावच्या तरुणाला बसला. या खेळापायी तो तब्बल 40 लाखांचा जुगार हरला. त्यासाठी त्याला घरातली शेतीही विकावी लागली. परमेश्वर केंद्रे असे त्या तरुणाचे नाव आहे. परमेश्वरने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, त्यांनी अजून तरी गुन्हा दाखल करून घेतला नाही. मात्र, त्याला बँक स्टेटमेंट आणण्याचा सल्ला दिला आहे.ढगी गावच्या परमेश्वर केंद्रेला मॉस्ट बेट हा ऑनलाइन गेम खेळण्याचा नाद लागला. त्याने याची सुरुवात शंभर रुपयांपासून केली. तो यात अनेकदा जिंकला. त्याला त्याचे पैसे मिळाले. तेव्हा तो दोनशे, पाचशे असे रुपये लावून खेळू लागला. हा आकडा नंतर हजारोंमध्ये गेला. इथूनच त्याच्या पडझडीची सुरुवात झाली. एका परदेशी कंपनीने मॉस्ट बेट गेमची निर्मिती केली. मात्र, हा गेम भारतात खेळण्यासाठी बंदी आहे. तो प्ले स्टोअरवरही उपलब्ध नाही. अनेकजण तो लिंकद्वारे डाऊनलोड करतात. आणि पैसे लावायला सुरुवात करतात. या सुरुवातीला बोनस मिळतो. या आमिषापोटी खेळणे सुरू होते. याचे रूपांतर नंतर अक्षरशः व्यसनात होते.

 

 

नाशिक जिल्ह्यातही घटना

नाशिक जिल्ह्यातही ऑनलाइन गेममध्ये अनेक तरुणांची फसवणूक झाल्याचे मागे समोर आले होते. तिथे अशा टोळ्या सक्रिय आहेत की, ते ऑनलाइन गेम खेळण्यास प्रोत्साहन देतात. प्रसंगी कर्जासाठी पैसा पुरवतात. नंतर मात्र त्या मोबदल्यात शेतजमीन नावावर करून घेतात. यातून अनेक तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.

Advertisement

Advertisement