Advertisement

युसूफवडगांवमध्ये वीज कोसळून एक ठार

प्रजापत्र | Thursday, 13/04/2023
बातमी शेअर करा

केज दि.१३ (प्रतिनिधी)-तालुक्यातील युसूफवडगांव येथे गुरुवारी सहा वाजेच्या दरम्यान झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. तर वीज पडून एक मुलगा ठार तर एक जखमी झाला आहे.

    दोन्ही मुले युसूफवडगांव येथे काही कामानिमित्त आलेले असता काम आटोपुन परत जात असताना ६ वाजेच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. केज रोडवरील सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे आले असता चालत्या मोटारसायकलवर वीज पडली. यामध्ये गाडी चालवणारा संकेत चंदर गित्ते (वय-१९ रा.धोतरा ता.केज) याचा जागीच मृत्यु झाला तर सुशांत विक्रम वाकळे (२१) रा. केज हा जखमी झाला आहे.घटनेची माहिती मिळताच युसूफवडगांव पोलिस स्टेशनचे सहा.पो.नि. योगेश उबाळे व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी हजर झाले व जखमीस पुढील उपचारासाठी अंबाजोगाईला पाठवले.

Advertisement

Advertisement